¡Sorpréndeme!

Udayanraje Bhosale Special Report  | शिवस्मारकाचा आग्रह, सरकारचा काय निग्रह?

2025-04-12 1 Dailymotion

अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याची घोषणा होऊन काळ लोटला...पण अजून शिवस्मारक काय त्याच्या बांधकामाचा पायाही रचला गेला नाहीय...सत्ताधारी आणि विरोधकांच्या विस्मृतीत हा विषय गेलाय की काय असं वाटायला जागा आहे...मात्र आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोरच तेही रायगडावर खासदार उदयनराजे भोसलेंनी हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला...शिवस्मारकाची सध्यस्थिती काय आहे, पाहुयात या रिपोर्टमधून. 
महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या शिवरायांवरून वेळोवेळी राजकारण रंगतं...  शिवरायांच्या स्मृतींचा ठेवा असणाऱ्या गडकिल्ल्यांच्या संवर्धानाचा विषय अनेकदा निघतो...  शिवजयंती आणि शिवराज्याभिषेकदिनी रायगडासह राज्यभरात मोठा सोहळा होतो...  पण अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाची वीट मात्र वर्षानुवर्षे पुढे सरकत नाही...  रायगडावर अमित शाहांच्या उपस्थित खासदार उदयनराजे भोसलेंनी शिवरायांच्या स्मारकाच्या मुद्द्याला हात घातला...  आणि शिवरायांचं स्मारक अरबी समुद्राऐवजी राजभवनाच्या परिसरात व्हावं असा तोडगा सांगितला...